#अपडेट: करुणानिधी यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा

चेन्नई: तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि ‘डीएमके’चे पक्षप्रमुख एम.करुणानिधी यांना शुक्रवारी मध्यरात्री अचानक कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९६ वर्षीय करुणानिधी यांना मूत्रपिंडाचा आजार असून, शुक्रवारी रात्री अचानक रक्तदाब कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र करुणानिधी यांचे पुत्र एमके स्टॅलिन यांनी माध्यमांशी बोलताना  “करुणानिधी यांची तब्येत सुधारत असून पक्षकार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये” असे आवाहन केले आहे.  ‘डीएमके’ प्रमुख एम.करुणानिधी यांची कन्या कनिमोझी यांनी देखील त्यांच्या वडिलांची तब्येत सुधारत असल्याचे सांगितले आहे. “करुणानिधी यांचा रक्तदाब स्थिरावला असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय तज्ञ लक्ष ठेऊन असल्याने चिंतेचे कारण नाही” अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान करुणानिधी यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आत्तापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयात हजेरी लावली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)