लासुर्णे -इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेला करोनाची बाधा झाली आहे. संबंधित बाधित महिला बारामती येथील वसंतनगरमधील आहे. बाधित परिचरिकेच्या संपर्कात आलेल्या 15 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
त्यातील 5 कर्मचाऱ्यांच्या घशातील नमुने बारामती येथे (दि.11) देण्यात आले आहेत. इतर 10 कर्मचाऱ्यांची रविवार (दि.12) तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.