करुणा शर्मांना अखेर जामीन मंजूर

बीड – करुणा शर्मा यांना अखेर अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर शर्मांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत परळी आणि अंबाजोगाईमध्ये येण्यास करुणा शर्मांना मज्जाव केला आहे. करुणा शर्मांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल काल राखीव ठेवण्यात आला होता. त्यावरील सुनावणी आज पार पडली आहे.

शर्मा यांना 5 सप्टेंबर रोजी परळी येथे अटक कऱण्यात आले होते. अटक झाल्यानंतर त्यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली होती. जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात १६ दिवसांपासून त्या न्यायालयीन कोठडीत होत्या.

करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्या होत्या.

परळीत येताच महिलांनी त्यांना घेराव घातला. यादरम्यान, एका महिलेला जातिवाचक शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोप शर्मा यांच्यावर लावण्यात आला होता. तर, त्यांचा सहकारी अरुण मोरे याच्यावर गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी अटक केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.