मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा आणि त्यांचा मित्र अजयकुमार देढेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. करुणा शर्मा आणि अजय देढेच्या विरोधात त्याच्या पत्नीने पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
अजयकुमार देढे हा करुणा शर्माचा पीए म्हणून वावरत होता. मात्र प्रत्यक्षात दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे अजयकुमार देढेने त्याच्या बायकोकडे घटस्फोट देण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी अजयकुमार देढे आणि करुणा शर्मा हे देढेच्या पत्नीला धमकावत होते.
दोघांनी मिळून पुण्यातील भोसरी भागात देढेच्या पत्नीला बोलावून हॉकी स्टीकच्या सहाय्याने धमकावल्याच तक्रारीत म्हटले आहे. त्याचबरोबर करुणा शर्माने जातीवाचक शिवीगाळ केल्याचही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे करुणा शर्माच्या विरोधात एट्रॉसीटीचा गुन्हा देखील करण्यात आला आहे.
करुणा शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात एट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. करुणा शर्मा यांच्याविरोधात येरवडा येथील एका महिलेने तक्रार दिली होती. या महिलेने तक्रारीत करुणा शर्मावर धक्कादायक आरोप केले आहे. करुणा शर्माने शस्त्रे दाखवून शिवीगाळ, अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.