राजगुरूनगर | त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष दिव्यांनी उजळले कार्तिकस्वामी, सिद्धेश्वर मंदिर

राजगुरूनगर (प्रतिनिधी) : त्रिपुरारी पौर्णिमेच्यानिमित्ताने राजगुरुनगर येथील कार्तिकस्वामी, सिद्धेश्वर मंदिरपरिसरासह स्मशानभूमीत लावलेल्या लक्ष-लक्ष दिव्यांनी परिसर उजळून निघाला. राजगुरुनगर येथे भिमादीच्या काठावर असलेल्या पौराणिक सिध्देश्वर मंदिराजवळ असलेल्या व खेड पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या कार्तिकस्वामी मंदिर व त्याशेजारील स्मशान भूमीत त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने भाविक भक्त व नागरिकांनी लक्ष-लक्ष दिवे लावून कार्तिकी स्वामीचे दर्शन घेतले.

दर्शनासाठी राजगुरुनगर शहर व परिसरातील महिलांनी दर्शनासाठी व मंदिर व स्मशान भूमीत दिवे लावण्यास गर्दी केली होती. कार्तिकी स्वामी मंदिर व मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट करून सजविण्यात आला होता.

आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगर येथील भीमानदी तीरावरील पोलीस स्टेशन जवळील मंदिरात व सिद्धेश्वर मंदिर परिसरातही भक्तांनी भगिरथी कुडांवर आणि मंदिर परिसर लक्ष लक्ष पणत्या लावून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. तसेच शहरातील पोलीस ठाण्याजवळ असलेल्या भिमानदी काठी पोलिस स्टेशनजवळ असलेल्या खडकेश्वर गणेश मंदिर व कार्तीकीस्वामी मंदिर आणि त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत पणत्या लावल्याने हा परिसर लक्ष-लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला.

कार्तिक स्वामीचे पुण्यात (पर्वती), खेड तालुक्यात राजगुरुनगर आणि नाशिक याठिकाणी मंदिरे आहेत. राजगुरुनगर येथे कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील अनेक भागातून भाविक भक्त येतात. यात महिला भाविकांची संख्या मोठी असते.

मागीलवर्षी करोना विषाणू संकट असल्याने भाविकांची संख्या कमी होती मात्र यावर्षी नुकतीच मंदिरे खुली केल्याने भविकांसह महिलांनी येथे गर्दी केली. वर्षातून एकदाच म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला महिलांना कार्तिकीस्वामींचे दर्शन मंदिरात जाऊन घेता येते.  कार्तिकस्वामींचे वाहन मोर पक्षी असल्याने मोरपिस कार्तिकस्वामींच्या पुढे दर्शन घेताना ठेवल्यानंतर ती घरी नेली जातात. कार्तिकीला मोरपीस, रुद्राक्ष, कोहळा, तीळ वाहण्याची पंरपरा आहे. मोरपीस घरी नेल्यावर पुजा करुन ते जपुन ठेवले जाते. एरवी स्मशानात चित्ता पेटत असतात. रात्रीच्या वेळी येथे भयाण शांतता असते.आज मात्र येथील स्मशान भूमी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.