मी कार्तिकला डेट करते मात्र…

कार्तिक आर्यनच्या चित्रपटापेक्षा त्याच्या लिंकअपच्या बातम्याच अधिक चर्चेत असतात. बॉलिवूडच्या दुनियेत कार्तिकचे पहिल्यांदा नाव दंगलची फातिमा सना शेखशी जोडले गेले होते. त्यानंतर नुसरत भरुचाशी त्याचे नाव जोडले गेले. तिच्यासमवेत त्याचे चार चित्रपट आहेत. त्यानंतर त्याचे नाव मॉडेल डिंपल शर्मा आणि बी-टाऊनची अभिनेत्री अनन्या पांडेशी देखील जोडले गेले.

यातच, गेल्या काही दिवसांपासून सारा अली खानशी देखील त्याचे लिंकअप असल्याची चर्चा होती. दोघांच्या वाढत्या जवळीकीमुळे अमृता सिंह नाराज असल्याचे बोलले जात होते. याबाबत अमृता सिंहने तिची झाडाझडती घेतल्याचेही वृत्त आहे. परंतु कार्तिकने कोणत्याच लिंकअपला मान्य केले नाही.

दरम्यान, दोघंही त्यांचा आगामी सिनेमा लव्ह आज कलच्या प्रमोशनमध्ये बीझी आहेत. पण पुन्हा एकदा या सिनेमापेक्षा जास्त चर्चा होतेय ती या दोघांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीची.


हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत. मध्यंतरीच्या काळात या दोघांच ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये जवळीक पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

Here’s our secret!! ??‍♀️?? #HaanMainGalat out now ???? #DoItWithATwist #LoveAajKal ❤️ Link in Bio ??‍♀️

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

प्रोमोशनदरम्यान, साराला कार्तिकसोबतच्या नात्याविषयी विचारण्यात आलं. साराला तु कार्तिकला डेट करतेस का असा प्रश्न विचारण्यात आला.यावर उत्तर देताना सारा म्हणाली, ‘हो मी कार्तिकला डेट करते पण या सिनेमामध्ये. मी रिअल लाइफमध्ये कार्तिकला डेट करत नाही. तुम्ही आमची केमिस्ट्री 14 फेब्रुवारीला सिनेमागृहात पाहू शकता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.