भूल भुलैया-2 ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेल्या ‘भूल भुलैया 2′ ची घोषणा झाली आहे. जवळपास 13 वर्षांनंतर अक्षय कुमार आणि विद्या बालनच्या “भूल भुलैया’चा सीक्वल येत आहे. या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत आहे. 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. कार्तिकने त्याचा चित्रपटातील फर्स्ट लूक सोशल मेडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट 31 जुलै 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

2007 साली प्रदर्शित झालेला “भूल भुलैया’ हा चित्रपट रजनीकांत यांच्या तमिळ चित्रपट “चंद्रमुखी’चा रिमेक होता. अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी आहुजा, अमिशा पटेल यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता.

अंधश्रद्धा आणि विज्ञान या दोघांची किनार या चित्रपटाला होती. अमेरिकेतील जोडप सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी भारतातील आपल्या घरी परतते. या घरात सुरू झालेला अंधश्रद्धेचा खेळ आणि त्यातून संपूर्ण कुटुंबाला बाहेर काढणार मानसोपचारतज्ज्ञ साधरण अशा कथेवर हा चित्रपट आधारलेला होता. आता दुसऱ्या चित्रपटातील नेमकी कथा समजलेली नसली तरी कार्तिक आर्यनचा लूक भुल भुलैया मधिल अक्षयच्या लूकशी मिळता जुळता असल्याने हा चित्रपटही साधारण याच कहानीशी मिळता जुळता असण्यची शक्‍यता वर्तविण्यात येते आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)