कार्तिकी गायकवाडचं ठरलं, ‘या’ दिवशी होणार साखरपुडा

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’ या प्रसिद्ध संगीत रिअ‌ॅलिटी शो मधून आपल्या सुमधुर आवाजाच्या जोरावर रसिकांच्या मनावर राज्य करणारी गायिका ‘कार्तिकी गायकवाड’ आता आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग खेळण्यास तयार झाली आहे.

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार येत्या 26 जुलै रोजी कार्तिकीचा रोनित पिसे या तरुणाशी साखरपुडा होणार आहे. नुकतंच तिचा बघण्याचा कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे शासनाने दिलेले सर्व नियम पाळून तिचा साखरपुडा घरातच पार पाडणार आहे. रोनितला देखील संगिताची आवड असून, त्याने मेकॅनिकल इंजिनिअर चे शिक्षण घेतले आहे.

कार्तिकीने आपल्या गायिकेच्या जोरावर संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘घागर घेऊन… घागर घेऊन’ या गवळीनेने तर ती तुफान लोकप्रिय झाली. या गाण्याची गायिका म्हणून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. मग तिने मागे वळून पाहिलंच नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.