कार्तिकेयन, गौरव गिलच्या सहभागाचे आकर्षण

नवी दिल्ली: भारतीय मोटरस्पोर्टस्‌ इतिहासात पहिल्यांदा भारताचा पहिला एफ-वन चालक नारायण कार्तिकेयन, आघाडीचा रॅली चालक गौरव गिल यासह अनेक राष्ट्रीय रेसिंग स्पर्धेतील चॅम्पियन अनिंदिथ रेड्डी हे सर्वजण जे के टायर फेस्टिव्हल ऑफ स्पीडमध्ये (जेकेएफओएस) आपला सहभाग नोंदवणार आहेत. “फेस्टिव्हल ऑफ स्पीड’मध्ये एक्‍स वन फॉर्म्युला, रेसिंग कार्स, एलजीबी फॉर्म्युला 4 कार्स, 1000 आणि 600 सीसी सुपर बाईक्‍स, गिक्‍सर कप अशा प्रकारांचा समावेश असेल.

बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या जेकेएफओएसमध्ये इंडियन एलजीबी फॉर्म्युला 4 आणि जे के टायर सुझुकी गिक्‍सर कपच्या अंतिम फेरीतील थरार अनुभवण्यास मिळणार आहे. यासोबतच नवीन फ्रेंचायझीवर आधारित सहा संघांचा समावेश असलेल्या एक्‍स वन फॉर्म्युला रेसिंगची सुरुवात होणार आहे. जेकेएनआरसी फिनालेमध्ये 40 हजारहून अधिक फॅन्सच्या सहभागाची अपेक्षा आहे. या सर्वांना रेसिंग, स्टंट, मनोरंजन व आघाडीचे सेलेब्रिटी यांना अनुभवता येईल.

या स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये प्रत्येक संघात एक पुरुष आंतरराष्ट्रीय व महिला चालक, एक भारताचा आंतरराष्ट्रीय चालक आणि भारताचे दोन आघाडीचे चालक यांचा सहभाग असेल. त्यामुळे चांगली चुरस पाहायला मिळणार आहे.
या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय रेसिंगमधील दिग्गज माटिआस लाऊडा, फ्रॅंकी चेंग आणि वितांतोनिओ लियुझी यांचा समावेश असेल. यांसह भारताचे आघाडीचे रेसर कार्तिकेयन, गिल, अनिंदिथ, मैनी बंधू, कृष्णराज म्हाडीक, नयन चॅटर्जी, विष्णू प्रसाद यांचा समावेश असेल. बाईक रेसिंगच्या चाहत्यांसाठी जेकेएफओएसकडून जेके सुपर बाईक कपचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये 1000 सीसी ते 600 सीसी दरम्यानच्या बाईक्‍सचा समावेश असेल. यामध्ये एशिया कप ऑफ रोड रेसिंगचे आयोजन देखील होईल. त्यामध्ये आशियातील आघाडीचे रायडर्स सहभागी होतील.

रेसिंग व्यतिरिक्त देशातील आघाडीचे स्टंटमन आपल्या मॉडीफाईड बाईक्‍स, गो कार्ट्‌स, कार्स आणि ट्रॅक्‍टरसह स्टंट दाखवतील. यामध्ये अमेरिकेचा नामांकित टू व्हिलर स्टंट चॅम्पियन ऍरॉन कोल्टनचा समावेश असेल. यासोबत मनोरंजन कार्यक्रम देखील असेल. जे के टायर फेस्टिव्हल ऑफ स्पीडमध्ये रस्ते सुरक्षेबाबत देखील चर्चा होईल. प्रतिष्ठेच्या जे के टायर- कॉंस्टिट्युशन क्‍लब ऑफ इंडिया कार रॅली फॉर पार्लमेंट्रियन्स हा या वर्षीच्या फेस्टिव्हलचा भाग असेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)