कार्तिक पाचगणीमध्ये रस्ता चुकला

कार्तिक आर्यन पाचगणीमध्ये “फ्रेडी’चे शुटिंग करतो आहे. शुटिंगदरम्यान सहज फिरायला बाहेर पडलेला कार्तिक आर्यन ड्रायव्हिंग करत करत लांबवर गेला आणि परतीचा रस्ताच विसरला. बराच वेळ तो इकडे तिकडे भटकत राहिला, पण त्याला रस्ताच सापडेना. यावेळी त्याच्याबरोबर आणखीन कोणीही नव्हते. 

एकटाच असल्याने त्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांची मदत घेतली. त्यांनी त्याला रस्ता सांगितला आणि कार्तिकने त्यांचे आभारही मानले. बदल्यात कार्तिकने त्यांच्याबरोबर सेल्फीदेखील काढला. सोशल मीडियावर कार्तिक आर्यनचा हा व्हिडिओ खूप व्हायरल व्हायला लागला आहे.

या व्हिडिओमध्ये कार्तिक आणि पोलीस शिपायांमधील संवाददेखील रेकॉर्ड झाला आहे. यावेळी कारमध्ये स्टार कार्तिक आर्यन बसलेला आहे, हे लक्षात आल्यावर त्याच्या कारभोवती गर्दी जमायला सुरुवात झाली. 

एक एक करत सर्व पोलीस कर्मचारी कार्तिकबरोबर सेल्फी घ्यायला लागतात आणि कार्तिकदेखील सर्वांबरोबर सेल्फी घेताना या व्हिडिओमध्ये दिसतो आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.