अनन्या पांडेने कार्तिक आर्यनला झापले

“पती, पत्नी और वो’चे शुटिंग सुरू झाल्यापासून अनन्या पांडे, कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरने सेटवर खूप मज-मस्ती करायला सुरुवात केली आहे. अशाच एका निवांत क्षणी गमती जमती करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट झाला आहे. अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यनसोबत दिग्दर्शक मुदस्सर अझिझ एका कारमध्ये बसले होते. या सिनेमासाठी वजन वाढवायला सांगूनही अनन्याने वजन न वाढवल्याबद्दल मुदस्सर अझिझ अनन्याची हजेरी घेत होता. कार्तिकला वेळ दिला नसतानाही त्याने 15 दिवसात वजन वाढवले, असे तो म्हणाला. त्यावर कार्तिक “हापशी’ असल्याचे अनन्या म्हणाली.

अनन्याने तीन महिन्यात केवळ 500 ग्रॅम वजन वाढवल्याचे कार्तिक म्हणाला. त्याला उत्तर देताना अनन्याने आपण 3 किलो वजन वाढवल्याचे सांगितले. “तू खोटे बोलती आहेस.’ असे कार्तिक म्हणाला. पण अनन्या एकदम उसळून “मी तुला मारून टाकेन. तुझ्या मिशा उपटून काढेन.’ असे म्हणाली.

“पती, पत्नी और वो’ मधील विशेष अतिथी कलाकार म्हणून क्रिती सेननही काही दिवस शुटिंगला येऊन गेली. 1979 च्या मूळ “पती, पत्नी और वो’मध्ये परवीन बाबीने पाहुण्या कलाकाराचा रोल केला होता. तोच रोल क्रिती सेनन करते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.