Bhool Bhulaiyaa 3 OTT Release Update | अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 1 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर ‘सिंघम अगेन’शी टक्कर होऊनही या चित्रपटाने जबरदस्त कामगिरी केली. बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा या चित्रपटाने पार केला. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.
‘भूल भुलैया 3’ हा ‘भूल भुलैया’ फ्रेंजायजीचा तिसरा भाग आहे. आधीच्या दोन्ही चित्रपटांप्रमाणेच तिसऱ्या भागानेही बॉक्स ऑफिस गाजवले. या चित्रपटाद्वारे विद्या बालनने 17 वर्षांनी मंजुलिका म्हणून पुनरागमन केले. तिने अक्षय कुमार स्टारर ‘भूल भुलैया पार्ट 1’ मध्ये मंजुलिकाची भूमिका साकारली होती. यातच आता कार्तिकच्या या चित्रपटाची ओटीटी रिलीजची तारीख समोर आली आहे.
भूल भुलैया 3 नेटफ्लिक्सवर 27 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन रूह बाबाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्याशिवाय तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित, संजय मिश्रा आणि राजपाल यादव यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
‘सिंघम अगेन’शी टक्कर
या चित्रपटाद्वारे कार्तिक आर्यनने त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट दिला. या चित्रपटाने सिंघम अगेनसारख्या मोठ्या स्टारकास्टसह चित्रपटांनाही मागे सोडले. अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, अर्जुन कपूर सिंघम अगेनमध्ये दिसले होते. या चित्रपटात सलमान खानचा कॅमिओ होता.
हेही वाचा:
“…म्हणून जरा अडचण झाली” ; आमश्या पाडवींनी सांगितले शपथविधीवेळी झालेल्या गोंधळाचे कारण ; पहा व्हिडीओ