सातारा जिल्ह्यात करोनाचे त्रिशतक

आणखी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आणखी 31 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती रविवारी रात्री आठ वाजता देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 309 झाली आहे.

जिल्ह्यात मंगळवारपासून करोनाने कहर केला आहे. मंगळवारी 28, बुधवारी 15, गुरुवारी 20 जण पॉझिटिव्ह आल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात एकही रुग्ण आढळला नव्हता; परंतु शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दिवसभरात 77 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 278 झाली. त्यामुळे जिल्हा हादरून गेला. त्यात रविवारी 31 रुग्णांची भर पडली आहे. त्यात जावळी तालुक्यातील 4, वाई तालुक्यातील 5, सातारा तालुक्यातील 3, खटाव तालुक्यातील 1, कराड तालुक्यातील 11, कोरेगाव तालुक्यातील 1, पाटण तालुक्यातील 3, महाबळेश्वर तालुक्यातील दोन अशा रुग्णांचा समावश आहे. दरम्यान, जिल्हा कारागृहातील सहा कैदी रविवारी करोनामुक्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत 120 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

93 जण विलगीकरण कक्षात

क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात काल (दि. 23)26 व रविवारी 29 आणि वाई ग्रामीण रुग्णालयात 38, अशा एकूण 93 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्रावांचे नमुने पुणे येथील एनसीसीएस या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित झालेल्या व्यक्तींची संख्या 278 झाली आहे. त्यापैकी उपचार घेत असलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या 151 आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमधून करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 120 आहे. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सात करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.