- 17 रुग्णांचा मृत्यू
- उपचाराधीन रुग्णांची संख्या 20 हजार पार
पिंपरी– पिंपरी चिंचवड शहरातील करोना विषाणूने थैमान घातले आहे. शहरातील वाढत्या बाधितांच्या संख्येने वैद्यकीय यंत्रणेसह नागरिकांच्या काळजात धडकी भरवली आहे. शनिवारी (दि. 3) दिवसभऱात तब्बल 2905 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. करोनाचे सर्वाधिक रुग्ण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आढळत होते. शनिवारी आढळलेल्या रुग्णांचा आकडा हा आपर्यंतचा उच्चांकी आकडा आहे. शहरातील करोनाची भयावह परिस्थिती समोर येत आहे. शहरात आजपर्यंत एकूण 1 लाख 47 हजार 546 करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच सध्या शहरात तब्बल 20,653 रुग्ण उपचार घेत आहेत.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 2832 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 73 रुग्णांची नोंद झाली. तसेच दिवसभरात 17 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहरातील 15 व शहराबाहेरील 2 जणांचा समावेश आहे.
आज दिवसभरामध्ये 1854 रुग्ण बरे झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 24 हजार 844 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 5981 संशयित रुग्णांची महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 2293 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 3493 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 17,160 वर पोहचली आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 20,653 आहे.
ब प्रभागात 400 हून अधिक रुग्ण
शहरातील ब प्रभागामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज ब प्रभागामध्ये तब्बल 423 नवीन करोनाबाधित रुग्णांची भर पडली. ब प्रभागामध्ये वाल्हेकरवाडी, दळवीनगर, विकासनगर, किवळे, मामुर्डी, बिजलीनगर, काळेवाडी या भागांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त शहरातील अ प्रभागात 356 व क 378, ड 361, फ प्रभागात 399 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर इ प्रभाग 336, ग 296 व ह प्रभागात 289 बाधित आहेत.
जिल्हा रुग्णालयात 41 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 3) 41 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.जुनी सांगवी, पिंपळे सौदागर, नवी सांगवी, पुणे, ताथवडे, रहाटणी, पिंपळे गुरव, विश्रांतवाडी, हिंजवडी, नऱ्हे, दापोडी, बालेवाडी, म्हाळुंगे, मारूंजी, वाकड, लोहगाव, देहूरोड, भोसरी, रहाटणी, पिंपळे निलख, काळेवाडी, खडकी आदी परिसरातील रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. करोनाने मृत्यू झालेले रुग्ण हे कात्रज आणि औंध येथील रहिवाशी आहेत. त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे. रुग्णालयातून करोनामुक्त झालेल्या 9 जणांना आज घरी सोडण्यात आले. त्यामध्ये शिरूर, औंध रस्ता, नवी सांगवी, कोंढवा, विशालनगर-जगताप डेअरी, येरवडा, मांजरी बुद्रुक येथील रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 69 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 34 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 977 जण बरे होऊन घरी परतले आहेत. 1 हजार 119 जणांना सध्या होम क्वॉरंटाइन केले आहे.