वालचंदनगर (वार्ताहर) – कळंब (ता. इंदापूर) येथील 19 वर्षांचा तरुणाचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आरोग्यविभाग व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी जंक्शन येथील एका व्यापाऱ्याची महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. दरम्यान, या महिलेच्या दुकानात दुकानामध्ये कळंब (लालपुरी) येथील एक 19 वर्षांचा युवक कामासाठी जात होता. त्याच्यामध्ये करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे त्याचे वडील व भावाला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून सोशल डिस्टन्सिंगही पाळावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.