राज्यातील आणखी 117 पोलिसांना करोना

मुंबई – राज्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढतच असून त्याचा विळखा करोना योद्धांनाही बसत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धे देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे यासाठी, या महामारीच्या काळात जीव धोक्‍यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यात आणखी 117 पोलीस करोनाबाधित आढळले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता 12 हजार 877 झाली आहे. यामध्ये पूर्णपणे बरे झालेले 10 हजार 491 जण, सध्या उपचार सुरू असलेले 2 हजार 255 जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 131 पोलिसांचा समावेश आहे.

राज्यातील 12 हजार 877 करोनाबाधित पोलिसांमध्ये 1 हजार 358 अधिकारी व 11 हजार 519 कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (ऍक्‍टिव्ह) 2 हजार 255 पोलिसांमध्ये 305 अधिकारी व 1 हजार 950 कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या 10 हजार 491 पोलिसांमध्ये अधिकारी 1 हजार 41 व 9 हजार 450 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 131 पोलिसांमध्ये 12 अधिकारी व 119 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.