नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
Get well soon @smritiirani ji. Just take good care of yourself. Wishing you a speedy recovery. 🙏
— sonu sood (@SonuSood) October 28, 2020
‘माझ्या कोविड चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनीही आपली कोरोना तपासणी करून घ्यावी,’ असे ट्विट करून स्मृती इराणी यांनी कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी गेट वेल सून… स्वत: ची चांगली काळजी घ्या..असं ट्विट केलं आहे.
It is rare for me to search for words while making an announcement; hence here’s me keeping it simple — I’ve tested positive for #COVID and would request those who came in contact with me to get themselves tested at the earliest 🙏
— Smriti Z Irani (@smritiirani) October 28, 2020
“स्मृतीजी तुम्ही स्वत:ची काळजी घ्या अन् लवकरात लवकर बऱ्या व्हा. आम्ही तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत.” अशा आशयाचं ट्विट करुन सोनूने करोनावर मात करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर स्मृती इराणी यांनीही इमोजी शेअर करुन सोनू सूदच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे.