लंडनच्या गार्डीयन वृत्तपत्राने केला पोलखोल
नवी दिल्ली : कर्नाटकच्या श्रीनिवास गौडामध्ये भारताचा उसेन बोल्ट पाहणाऱ्यांना धक्का देणारी बातमी लंडनच्या गार्डीयन या वर्तमानपत्राने प्रकाशित केली आहे. त्यात या सगळ्या प्रकरणाचा पोलखोल करण्यात आला आहे.
गौडाच्या पावलांना 142 मिटर अंतर केवळ 13.42 सेकंदात पार करणे हे केवळ बैलाच्या आधारामुळे शक्य झाले. स्थानिक बैलांच्या शर्यतीत बैलजोडी पळवताना या 28 वर्षीय युवकाने हा विक्रम केला होता. गौडा याच्या विक्रमाची बातमी समाज माध्यांत पसरताच त्याला योग्य प्रशिक्षण देण्याची मागणी क्रीडामंत्री किरण रिज्जू यांच्याकडे नागरिक करू लागले. त्याला प्रतिसाद देत रिज्जू यांनी त्याचा शोध घेऊन भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षण देण्याची सूचना केली.
मी धावण्याच्या ट्रॅकवर येवढ्या जोरात धावू शकणार नाही असे सांगत गौडा यांनी हा प्रस्ताव फेटाळला. बैल नसतील तर देशात खळबळ माजवणारे गौडा 100 मिटर धावण्यासाठी 11 सेकंद घेऊ शकतात, असे तज्ज्ञांच्या हवाल्याने या वृत्तात म्हटले आहे.
100 मिटर धावताना तो 11 सेकंद घेऊ शकतो. हा तरूण चपळ आहे. त्याचे शरीर दणकट आहे, पण साधी गोष्ट आहे, माणसांपेक्षा बैल अधिक वेगवान असतात. त्याचे काम त्यांना सरळ नेण्याचे आहे, असे डेव्हीड रॉडग्यूझ या माजी स्पॅनिश धावपटूने सांगितले. तो म्हणाला, माझ्यासाठी ही गंमतीदार भारतीय संस्कृतीची गोष्ट आहे, ही काही ऍथलिटची गोष्ट नाही.
मात्र त्याचवेळी रॉडग्यूझ यांनी गौडा यांच्यात क्षमता आहेत. ही काही वाईट सुरवात नाही, हे मान्य केले. ते म्हणाले, त्यांनी तो पाणथळ जागेतून अनवाणी धावला. तो कोरड्या जागेत आणि योग्य शूज घालून या पेक्षा अधिक सरस कामगिरी करू शकला असता हे मान्य केले.
बैलाच्या शर्यतीत निशांत शेट्टी याने गौडा याच्या पेक्षा सरस कामगिरी नोंदवली आहे. जर या दोघांनी योग्य प्रशिक्षण घेतल्यास भारतीय क्रीडा विश्वाला दोन तारे गवसू शकतात, असे यावृत्ताच्या अखेरीस म्हटले आहे.