कर्नाटक सरकारने कोगनोळी टोल नाक्यावर पुन्हा सुरू केला ‘कोरोना चेक पोस्ट’

कोल्हापूर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक प्रशासनाकडून पुन्हा एकदा चेक पोस्ट सुरू करण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत.

केंद्र सरकारचे याबाबतचे कोणतेही आदेश नसताना महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रत्येक गाडीचे आजपासून चेकिंग सुरू झाले आहे. येथील दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या कोगनोळी टोल नाका येथे हा चेक पोस्ट सुरू करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात कर्मचारी सुद्धा तैनात केले आहेत.

महाराष्ट्र व केरळ या राज्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने कर्नाटकने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केरळ व महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांचे थर्मल स्क्रीनिंग करून तसेच, त्यांच्याकडे कोव्हिड निगेटीव्हचे प्रमाणपत्र असल्याशिवाय कर्नाटकमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे परिपत्रकच कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी काढले आहे. त्यानंतर आता कागल येथील कोगनोळी टोल नाका येथील दोन्ही राज्यांच्या सीमेवर आता प्रत्येक वाहनधारकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. शिवाय, येथे मोठा मंडपही घालण्यात आला असून कर्मचारी सुद्धा तैनात केले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.