कर्नाटकात कमळ तरले 

बंगळूर – कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांची आज मतमोजणी सुरु आहे. यामध्ये भाजपाने 6 जागांवर विजय मिळवला असून 6 जागांवर घेतली आहे. तर काँग्रेसनेही 1 जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, पुन्हा सत्ता राखण्यासाठी येडियुरप्पा सरकारला केवळ सहाच जागांची आवश्यकता आहे. यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जाणार आहे. दरम्यान, काँग्रेसने आपला पराभव स्वीकार केला असल्याचे काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

कॉंग्रेस आणि जेडीएसच्या 17 आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे त्या पक्षांचे कर्नाटकमधील आघाडी सरकार कोसळले. त्या बंडखोरीचा राजकीय फायदा उठवत त्या राज्यात भाजपने सत्ता काबीज केली. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्याने रिक्त झालेल्या जागांपैकी 15 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. कर्नाटकात एकूण 223 जागा आहेत. भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 112 आमदारांची गरज होती. भाजपाला सध्या 6 जागांवर विजय मिळवला असून 6 जागांवर घेतली आहे. यामुळे भाजपचे ११७ आमदार होणार असल्याने येडियुरप्पा सरकारला मोठा दिलासा मिळला आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसला 1 तर अपक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. तर जेडीएसचे अद्यापही खाते उघडले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.