कर्नाटकात बसपा आमदार राहणार अनुपस्थित

बंगळुरू – कर्नाटकातील बहुजन समाज पक्षाचे एकमेव आमदार एन महेश हे विधानसभेत होणाऱ्या विश्‍वासदर्शक ठरावाच्यावेळी अनुपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आपल्याला अनुपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे असे त्यांनी म्हटले आहे. हे आमदार सत्ताधारी आघाडी बरोबर होते. नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला होता असे सांगितले जात होते.

पण आता ते अनुपस्थित राहणार असल्याने त्यांचे मत दोन्ही बाजूंपैकी कोणालाही गृहीत धरता येणार नाही. सोमवारी आणि मंगळवारी मी माझ्या कामानिमीत्त माझ्या मतदार संघात व्यस्त राहणार असल्याने मी मतदानात सहभागी होणार नाही असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. दोन अपक्ष आमदारांचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा असल्याने बहुमतासाठी आवश्‍यक असणारा 105 चा आकडा भाजपने पार केला आहे आणि या अपक्षांच्या पाठिंब्यावर त्यांचे संख्याबळ 107 इतके झाले आहे. त्यामुळे आज तरी भाजपची बाजू वरचढ दिसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)