नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांची निवडणूक व्यवस्थापन समितीच्या निमंत्रकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
एका समितीचे प्रमुख म्हणून बोम्मई या लिंगायत नेत्याची आणि दुसऱ्या समितीचे निमंत्रक म्हणून करंदलाजे या वोक्कलिंगा समाजाच्या नेत्याची निवड करून भाजपने दोन प्रबळ जातींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
Delhi excise policy case : ईडीने जबरदस्तीने जबाब नोंदवून घेऊन त्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या…
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची प्रचार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही समित्यांवर अन्यही नेत्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.