नवी दिल्ली/बेंगळुरू – मे महिन्यापर्यंत होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी 22 मार्च रोजी उगादी उत्सवाच्या दिवशी म्हणजेच कन्नडिगांच्या नवीन वर्ष दिनी जाहीर केली जाईल, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी सांगितले. शुक्रवारी नवी दिल्लीत कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सिद्धरामैय्या सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, या बैठकीत राहुल गांधींच्या राज्यभेटीबाबतही चर्चा झाली.
राहुल गांधी 20 मार्चला बेळगावी येथे राज्यस्तरीय युवा रॅलीत सहभागी होण्यासाठी येत आहेत, आम्ही त्याच्या तयारीवर चर्चा केली आहे, असे सिद्धरामय्या यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 125 उमेदवारांची पहिली यादी मंजूर केली आहे, ज्यात 61 विद्यमान कॉंग्रेस आमदारांचा समावेश आहे.
पक्षाच्या स्क्रीनिंग समितीने या महिन्याच्या सुरुवातीला तिकीट इच्छुकांच्या सर्व अर्जांचे पुनरावलोकन केले होते. आणि ती यादी पक्षाच्या मध्यवर्ती समितीकडे सादर केली आहे. त्यात ही तिकीटे मंजुर करण्यात आली आहेत. शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले की, सीईसीने राज्य स्क्रीनिंग कमिटीने शिफारस केलेल्या नावांवर चर्चा केली आणि बहुतेक नावांना मान्यता दिली आहे आणि एआयसीसी त्याची घोषणा करेल.
या सर्वांनी चांगले काम केले आहे, असे सांगून बहुतेक विद्यमान आमदारांना तिकीट मिळू शकते, असे संकेतही त्यांनी दिले.
कर्नाटकात स्पष्ट बहुमतासह सत्तेत येण्यासाठी कॉंग्रेसने 224 सदस्यीय विधानसभेत किमान 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जनता दल सेक्युलरने विधानसभा निवडणुकीसाठी 93 उमेदवारांची पहिली यादी आधीच जाहीर केली आहे, भाजप अद्याप त्यांची यादी जाहीर केलेली नाही.