बंगळुरू – कर्नाटकातील हासन जिल्ह्यात संतापजनक घटना घडली आहे. येथे एका विकृताने 60 माकडांना विष देऊन पोत्यात भरले. त्यातील 46 माकडांचा मृत्यू झाला असून 14 माकडांना वाचवण्यात यश आले आहे.
हासन जिल्ह्यातील सकलेशपूर भागात माकडांच्या मृत्यूची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी पाहिले असता पोत्यात माकडं मृत्यू पावल्याचे दिसले. त्यातील काही जण हे अत्यवस्थ होते. तात्काळ त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. 14 माकडांना वाचवण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे.
दरम्यान, ही घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी हासन शहर पोलीसात अज्ञाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.