महाभारतावर आधारित सिनेमात शाहिद कपूर बनणार कर्ण

शाहिद कपूरच्या “जर्सी’चे शूटिंग आता पूर्ण झाले आहे आणि आता या सिनेमाचे पोस्ट प्रॉडक्‍शन सुरू आहे. सध्या शाहिद कपूर ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यास उत्सुक आहे. एका वेबसिरीजमध्ये तो काम करणार आहे आणि त्याच्याबरोबर दक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्ना देखील असणार आहे.

याशिवाय शाहिद कपूर राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या “महाभारत’ मध्ये कर्णाची भूमिका करणार आहे, असे समजले आहे. शाहिदला या महाभारताचे स्क्रिप्ट आवडली आहे. महाभारताच्या या सिनेमात कर्ण बनण्याचे शाहिद कपूरने मान्य केले आहे, असेही समजले आहे. हा सिनेमा 2023 मध्ये रिलीज करण्याचे नियोजन आहे.

कर्ण बनण्यासाठी शाहिद कपूरला खूप शारीरिक मेहनत करावी लागणार आहे. महाभारतातील अश्‍वत्थामावर देखील रॉनी स्क्रूवाला एक सिनेमा बनवत असून अश्‍वत्थामाचा रोल विकी कौशल करणार आहे.

जॅकी भगनानी यांनीदेखील “कर्ण’ याच नावाच्या आणखी एका सिनेमाची घोषणा केली आहे. काही महिन्यांपूर्वी आमिर खानने देखील महाभारतावर सिनेमा बनवण्याचा आपला विचार जाहीर केला होता. मात्र त्याचे नंतर काय झाले हे समजले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.