“बॉलिवूड वाईव्हज’वरून करण-मधुरमधील वाद थांबला

 

दोन कलाकारांमध्ये वाद होणे नवी गोष्ट नाही. पण निर्मात्यांमध्ये सिनेमाच्या नावावरून वाद फारच क्‍वचित होतात. मधुर भंडारकर आणि करण जोहरमध्येही “बॉलिवूड वाईव्हज’ या नावावरून असाच वाद झाला. मधुर भंडारकरने “बॉलिवूड वाईव्हज’ या नावाने सिनेमाच्या शिर्षकाची नोंदणी करून ठेवली होती. तर करण जोहरने नेटफ्लिक्‍सवर “द फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाईव्हज’ या नावाने एका कार्यक्रमाचे शीर्षक निश्‍चित केले.

मात्र यावरून मधुर भंडारकर खूपच अपसेट झाला आणि त्याने सोशल मिडीयावर तीव्र नाराजीही व्यक्‍त केली आहे. मधुरची ही नाराजी दूर करण्यासाठी करण जोहरने मधुर भंडारकरच्या नावे एक खुले पत्र ट्‌विटरवर पोस्ट केले. “आपण दोघेही एकाच इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहोत. मला तुझ्या कामाचा खूप आदरही आहे.

माझ्या कार्यक्रमाच्या शीर्षकामुळे तुला झालेल्या मनस्तापाबद्दल मी दिलगिर आहे. पण माझा कार्यक्रम रिऍलिटी शो आहे. त्याच्या शीर्षकातील अर्धा भाग केवळ सारखा आहे.’ असे स्पष्टीकरण करण जोहरने दिले आहे. त्याच्या या स्पष्टिकरणावर मधुरनेही आपली नाराजी सोडून दिली. हा विषय इथेच सोडून देऊ आणि आपल्यातील वाद इथेच संपवून देऊ, असेही मधुर भंडारकरने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.