Karmole Kusti Dangal 2026 : मुळशी तालुक्यातील करमोळी येथे होळी उत्सवानिमित्त ‘श्री कालभैरवनाथ कुस्ती दंगल २०२६’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. ३ रोजी सायंकाळी ४ नंतर ही भव्य कुस्ती स्पर्धा रंगणार असल्याची माहिती संस्थापक संदीप राजेंद्र केदारी यांनी दिली. या दंगलीतील पहिल्या क्रमांकाची मानाची कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेले शिवराज राक्षे आणि भारत केसरी विजेते विरेंद्र कुमार सिंह यांच्यात होणार आहे. या मानाच्या कुस्तीसाठी निलेश आल्हाट, अनिल जाधव, विशाल शेळके आणि निलेश सुर्वे यांच्या वतीने ३ लाख ५१ हजार रुपयांची गदा जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय अभिजित भोईर विरुद्ध कुमार माने, संकेत ठाकूर विरुद्ध अभि शेडगे, अमित कंधारे विरुद्ध तेजस मारणे अशा प्रमुख लढती रंगणार आहेत. महिला गटात श्रेया परदेशी विरुद्ध रुपाली वाघ, ईश्वरी मेंगडे विरुद्ध मीनाक्षी चोरगे तसेच वेदिका कालेकर विरुद्ध अंतरा कंधारे यांच्या कुस्त्या होणार असून एकूण ३५ हून अधिक कुस्त्या पार पडणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन शरद केदारी, अमोल केदारी, दिनेश केदारी, महेश अल्हाट, सचिन केदारी, प्रणित केदारी, दिलीप केदारी, अनिल केदारी, आदेश केदारी, समीर केदारी, तुषार जाधव, दिगंबर केदारी, समीर प्रभाकर केदारी, शशिकांत जायगुडे, सुहास केदारी, रवींद्र जायगुडे, ऋषिकेश जाधव तसेच समस्त ग्रामस्थ करमोळी यांच्या वतीने करण्यात आले आहे. पंच म्हणून दत्ता रुकर, रोहिदास आमले आणि विक्रम पवळे काम पाहणार आहेत. कुस्तीमध्ये सहभागासाठी संतोष ज्ञा. केदारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या वेळी आमदार शंकर मांडेकर, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ तालीमचे अध्यक्ष गोविंद आंग्रे, मधुर दाभाडे (समन्वयक, काँग्रेस कमिटी मुळशी), बाबाजी शेळके, रमेश केदारी आणि राजेंद्र दोशी उपस्थित राहणार आहेत. तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सन्मानही करण्यात येणार असल्याचे संदीप केदारी यांनी सांगितले.