बिजवडी : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी दोन ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून अर्ज दाखल करण्याचा आज दुसरा दिवस आहे. एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.
माजी मंत्री पाटील यांनी ऊस उत्पादक कालठण गटातून एक अर्ज दाखल केला असून दुसरा अर्ज ब वर्ग प्रतिनिधी म्हणून दाखल केला आहे.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक कार्यकर्ते उपस्थित होते.