कर्जत- राशीन मार्गावर अपघाताचा धोका

कर्जत – राशीन व कर्जत-कोंभळी या दोन मार्गावरील अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावर पुलाचे कामे चालू आहेत. सध्या येथील वाहतूकीसाठी मुरूमाच्या पर्यायी रस्त्याचा वापर करण्यात येत आहे. अधून मधून पाऊस होत असल्याने हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होत आहे. चिखलामुळे दुचाकी वाहनांना धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. कर्जत राशीन या रस्त्यावर चालू असलेल्या पुलानजिक अपघात होऊन दोन इसमाचे बळी गेलेले आहेत. या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने रस्ता खोदून बरेच दिवस झाले परंतु कामाला गती नाही. खोदलेल्या रोडच्या कडेला कसलीच सुरक्षा व्यवस्था केली नसल्याचे अपघाताचा धोका वाढला आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अमरापूर ते बारामती व कोंभळी फाटा ते कर्जत या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून हा प्रस्तावित महामार्ग कर्जत तालुक्‍यातील मिरजगांव, कर्जत, राशीन ते खेड तर दुसरा मुख्य रस्ता कोंभळी, वालवड ते कर्जत हद्दीतून जातो. या मार्गावरील काही भागात काही पुलाचे कॉंक्रीटचे काम पूर्ण झाले आहे. तर मागील काही दिवसात पुन्हा काही कामे तालुक्‍यातील हद्दीत रस्त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र बऱ्याच दिवसापासून कर्जत राशीन हद्दीत खोदलेल्या अवस्थेत हा रस्ता तसाच आहे. सध्या पावसाच्या संततधार सरीमुळे या भागात हा रस्ता चिखलमय झाला आहे.

पावसामुळे हा रस्ता एकदम गुळगुळीत बनल्याने येथून दुचाकी वाहन चालविताना वाहनधारकांना काटकसरीने वाहन चालवावे लागत आहे. या रोडवरून कर्जत, राशीन तसेच चिलवडी, खेड, भांबोरा सिध्दटेक आसपासच्या परिसरातील कामगार, नोकरदार, कामाला याच रस्त्यावरून येत असतात. मात्र रस्ता चिखलमय झाल्याने जीव धोक्‍यात घालून प्रवास करावा लागत आहे. याचबरोबर या गावातील अनेक शालेय विद्यार्थी याच रस्त्याने राशीनकडे किंवा तालुक्‍याच्या ठिकाणी कर्जतला जात असल्याने उपयोगी महामार्गावरील कर्जत ते खेड हद्दीत रस्ता वाहतूकीस धोकादायक बनल्याचे चित्र आहे.

अनेक दिवसांपासून कर्जत-राशीन हा रस्ता खोदलेला आहे. अनेक वेळा हा रस्ता पावसामुळे चिखलमय असतो या रस्त्यावरून दुचाकी नेत असताना जीव धोक्‍यात घालून प्रवास करावा लागतो.

सुभाष माळवे प्रवासी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here