कर्जत तालुक्‍यात गणेश विसर्जन शांततेत 

कर्जत – शहर आणि तालुक्‍यात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. अबालवृद्धांनी आपल्या लाडक्‍या बाप्पाला उत्साहात आणि जल्लोषात भक्तिमय निरोप दिला. शहरात सकाळपासून घरगुती व बालमंडळांनी आपल्या लाडक्‍या बाप्पाचे भक्तिभावात विसर्जन केले. त्यानंतर काही प्रमुख गणेश मंडळांच्या मिरवणुका सायंकाळी सुरू झाल्या, यावेळी तरुणांनी जल्लोषात मिवणुकीमध्ये सहभागी होत लाडक्‍या बाप्पाला आकर्षक सजावटीमध्ये विराजमान करत मिरावणुकीसाठी मार्गस्थ केले.

शहरातील प्रमुख मार्गांनी जाऊन राशिन रस्त्यावरील बारवात गणेश विसर्जन केले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मिरवणूका

यंदा गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कर्जत शहरात दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक, दोन शांतता बैठक, पथसंचलन करीत काळजी घेतली होती. मोहरम आणि गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच प्रमुख मार्गावर पोलीस प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)