बारामती – कर्जत जामखेड बरोबरच आमदार रोहित पवार यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीवर देखील लक्ष केंद्रित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपायांच्या माध्यमातून बारामतीतही मदतीचा ओघ सुरू ठेवला आहे. तसेच बारामती शहर व तालुक्यातील अनेकांना फोनवरून संपर्क साधून अनेकांशी संवाद साधला आहे .
कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःची काळजी घ्या असा प्रेमाचा सल्ला देखील दिला आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेस 300 लिटर,पंचायत समितीस 200 लिटर,मेडिकल असोसिएशनसाठी 100 लिटर, पोलिस विभागास 100 लिटर व सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलसाठी 50 लिटर सॅनिटायझर दिले आहे.