कर्जत-जामखेडचे बस स्थानक होणार अत्याधुनिक

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश
जामखेड : महाराष्ट्रातील 150च्या आसपास असलेल्या बस स्थानकात व्हिडिओ वॉल, व्यापारी संकुल, स्वच्छ टॉयलेट्स, पिण्याचे पाणी अशा सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील बसस्थानकांचा आढावा घेऊन बसस्थानकाची तातडीने दुरुस्ती करावी. नवीन बसस्थानचा आराखडा तयार करुन बसस्थानकांची ठिकाणे निश्चित करावी, असे आदेश मंत्रालयात झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले.

स्वच्छतेबाबत प्रवाशांच्या तक्रारी दूर कराव्यात. बसस्थानके सुस्थितीत ठेवावी. प्रवाशांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा बसस्थानकामध्ये उपलब्ध करुन दिल्या तर त्याचा फायदा महामंडळाला होईल असे मंत्री म्हणाले.

पहिल्याच टप्यात अहमदनगर जिल्ह्यातून कर्जत-जामखेड बसस्थानकाच्या समावेश करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असुविधांच्या गराड्यात अडकलेल्या कर्जत-जामखेडचे बस स्थानके आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून अत्याधुनिक होणार आहे.

पहिल्या तीन स्थानकामध्ये त्र्यंबकेश्वर, दापोली स्थानकाचा समावेश आहे.  नगर जिल्ह्यात असलेल्या कर्जत जामखेड स्थानकाचे भूमिपूजन फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.