कर्जत तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह पाऊस 

कर्जत - तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने पिके जमीनदोस्त झाली आहेत.

पिके भुईसपाट : नुकसान भरपाईची मागणी

कर्जत – तालुक्‍याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील उभी पिके भुईसपाट झाली. तालुक्‍यातील कोपर्डी, शिंदे, बारडगाव, राशीन खेड आदी भागात पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र झंजावाती वादळामुळे शेतातील ऊस, कडवळ, मका, कपाशी, तुर आदी पिके भुईसपाट झाली. फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लिंबोनीची फळे गळून पडली असून ठीकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. रात्री उशिरा झालेल्या पावसाने शेकडो एकर क्षेत्रावरील पिके भुईसपाट झाली.

तालुक्‍यात वादळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी सहायक, तलाठी व इतर कर्मचारी पाठवले आहेत. – दिपक सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, कर्जत

तालुक्‍याच्या अनेक भागात ऊस, कपाशी तसेच लिंबोणी व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.
– सतीष सुद्रिक, माजी सरपंच, कोपर्डी.

मोठ्या कष्टाने जोपासलेली पिके वादळी वाऱ्याचा तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्‍यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या जिकिरीने पिके जोपासली होती. पाण्याच्या टंचाईला सामोरे जात जगवलेली पिके या वादळी पावसाने वाया गेली. कृषी विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)