प्रोड्यूसर म्हणून कमबॅक करणार करिश्‍मा कपूर

बॉलीवूड अभिनेत्री करिश्‍मा कपूरने 90च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 90च्या दशकात तिने आघाडीच्या अभिनेत्यांसोबत अनेक चित्रपटात मुख्य नायिकाच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु ती अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. आता करिश्‍मा कपूर लवकरच चित्रपटात कमबॅक करणार असल्याचे समजते.

लॉकडाउनच्या काळात करिश्‍मा कपूरने डिजिटल डेब्ये केले होते. एकता कपूरच्या “मेंटलहुड’ या वेब सीरिजमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. परंतु या वेब सीरिजला म्हणावे तसे यश मिळाले नाही. त्यानंतर आता करिश्‍मा कपूर प्रोड्यूसर म्हणून आपले नशिब आजमविण्याच्या तयारीत आहे. ती ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ऑरिजनल कंटेंट तयार करणार आहे.

दरम्यान, करिश्‍माच्या कुटुंबीयांकडून प्रोड्यूसर होण्यासाठी तिला प्रोत्साहन देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, करिश्‍मा आपली बहिण करीना कपूर-खानसोबत सह-निर्माता म्हणून काम करणार असल्याचे समजते. परंतु याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तसेच प्लानिंग स्टेजही निश्‍चित करण्यात आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.