मुंबई – बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक असलेली करिष्मा कपूर मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियामुळे चर्चेत असते. करिष्माने ९०न च्या काळात अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि सर्वच बड्या स्टारसोबत काम केलं. सध्या करिष्मा आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत असून चित्रपटांपासून थोडीशी दूर आहे. असं असाल तरी ती आपल्या मित्र मैत्रिणींच्या पार्टीमध्ये दिसून येते. अशाच एका पार्टीमधील तिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
पार्टी हा विषय बॉलिवूडसाठी काही नवीन नाही. अनेक स्टार्स हे चित्रपट आणि मालिकांमध्ये कमी दिसतात परंतु पार्टीमध्ये मात्र नेहमीच दिसून येतात. करिश्माने देखील अशाच एका पार्टीमध्ये हजेरी लावल्याचे समजते. करिश्माने यावेळी आपल्याच ‘दिल ले गई’ या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. बांधलेले केस आणि ब्लॅक ड्रेसमधील करिश्माचा यावेळसाचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होत.
View this post on Instagram
सोशल मीडियावर करिष्माच्या एका फॅन पेजच्या हा व्हिडीओ शेअर केल्याचे दिसून आले. तर एका मैत्रिणीच्या बॅचरल पार्टीमधील हा व्हडिओ असल्याचे समजते. बऱ्याच दिवसांनी करिष्माला पाहून चाहते मात्र चांगलेच खुश झाले आहेत.