मुंबई – 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री करिश्मा कपूर आज भलेही पडद्यापासून दूर असली तरी ती अनेकदा इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये दिसते. चाहते आजही त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. तिची आणि गोविंदाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कोणापासून लपलेली नाही.
चित्रपटांसोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. पती संजय कपूर सोबत विभक्त होणे आणि वाद सर्वश्रुत आहे. अशात अभिनेत्री आता तिच्या माजी पतीसोबत स्पॉट झाली आहे. यानंतर ती पुन्हा एकदा त्याच्यासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली आहे.
करिश्मा कपूर नुकतीच संजय कपूरसोबत स्पॉट झाली होती. दोघेही जेवणासाठी गेले होते, असे सांगितले जात आहे. अशात त्यांच्या नात्याबद्दल असेही बोलले जात आहे की, दोघे विभक्त होऊन अनेक वर्षे उलटली असली तरी ते दोघे मित्र आहेत. त्यांच्यात नवरा-बायकोचं नातं नसल, पण मैत्रीचं नातं अतूट आहे. व्हिडिओ समोर येताच लोकांनी त्यांच्या नात्यावर खूप कमेंट करायला सुरुवात केली.
करिश्मा कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूरने प्रिया सचदेवसोबत दुसरं लग्न केलं. प्रियाने पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. एवढेच नाही तर ती एक बिझनेस वुमन देखील आहे. अनेक शहरांमध्ये त्यांचे फॅशन बुटीकही आहेत. दोघांनी लग्नाआधी 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते आणि 2017 मध्ये लग्न केले. त्यांना एक मूलही आहे.