करिष्मा पुन्हा बोहल्यावर चढणार

करिष्मा कपूर आणि तिचा पूर्वाश्रमीचा नवरा संजय कपूर यांच्यात घटस्फोट होऊन बरीच वर्षे झाली आहेत. कायदेशीर घटस्फ्फोट होण्याच्या काही वर्षे आगोदरपासूनच करिष्मा आपल्या नवऱ्यापासून वेगळी राहत होती. तिने मुलांची जबाबदारीही आपल्यावरच स्वीकारली होती. आता करिष्मा पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजले आहे. संदीप तोष्णीवाल नावाच्या उद्योजकाबरोबर तिची खास मैत्री ही चर्चेचा विषय बनली होती. कपूर खानदानामध्ये होणाऱ्या प्रत्येक समारंभात आणि पार्ट्यांमध्ये संदीप तोष्णीवालची हजेरी असायची. त्यांच्यातल्या अफेअरला सिनेमॅगझीनने तिखटमीठ लावून रंगवायलाही सुरुवात केली होती. आता संदीप तोष्णीवाल आणि करिष्मा अधिकृतपणे विवाहबंधनात अडकणार आहेत. संदीप तोष्णीवालबरोबर लग्न करण्याच्या करिष्माच्या निर्णयाला पप्पा रणधीर कपूर यांनीही संमती दिल्याचे समजते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संजय कपूरबरोबर करिष्माचे मतभेद अगदी क्षुल्लक कारणावरून झाले होते. ही भांडणे झाली तेंव्हा करिष्माचा मुलगा 4 महिन्यांचा होता. मुलाची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे तिने इंग्लंडच्या ट्रीपला जायला नकार दिला होता. त्यावरून संजय कपूर रागावला आणि त्यांच्यात भांडणे झाली होती. याशिवाय करिष्माने गोल्फसाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी संजयचा तगादा असायचा. करिष्मावर हात उचलण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. या सर्व कटू आठवणींमधून तिला आता बाहेर यायचे आहे. सरते शेवटी आयुष्य पुढे सुरुच राहिले पाहिजे, असेच मत कपूर खानदानातील प्रत्येकाचे आहे. करिनानेही आपल्या दिदीला समजून घेत, तिच्या या निर्णयाला दुजोरा दिला आहे. गेली काही वर्षे करिष्माने अगदी कटू प्रसंगांचा सामना करत घालवली होती. त्यामुळे तिने पुन्हा नव्याने वैवाहिक आयुष्याला सुरुवात करावी या मताला सगळ्यांनीच समर्थन दिले आहे.

दिवाळीच्या नंतर लगेचच करिष्मा आणि संदीप तोष्णीवालच्या लग्नाचा बार उडवून दिला जाण्याची शक्‍यता आहे. लग्नासाठी नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यातील तारीख निश्‍चित केली जाऊ शकते. लग्नाला थोडेच दिवस शिल्लक राहिले असल्याने कपूर खानदानामध्ये आता तयारीची गडबड झाली आहे. करिष्माला आता मात्र कोणताही थाटमाट करायचा नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)