सैफ अली खान आणि करीना कूपर हे आपला मुलगा तैमूरसोबत कोणत्या कार्यक्रमात पाहण्यास आले असता त्यांचे फोटो एक चर्चेचा विषय ठरतो. आता जे फोटो व्हायरल झाले आहेत, ते विमानतळावरील असून यात करीना आणि सैफचा ट्रेडिशनल लुक सर्वांनाच पसंतीस पडला आहे.
करीना कपूर-खान ही एयरपोर्ट लुकमुळे सतत चर्चेत असते आणि जास्त करून ती वेस्टर्न लुकमध्येच दिसत असते. परंतु, आता तिला देशी पेहरावामुळे प्रसिद्धी मिळत आहे. सैफही कुर्ता-पायजामा या देशी पेहरावात दिसतो. सध्या करीना चंदीगढ येथे आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असून तिच्यासोबत तैमूरही आहे.
सैफने लाईट पिंक कुर्ता आणि व्हाईट पायजामा, तर करीनाने यलो कुर्ता आणि ग्रे पायजामात खूपच सुंदर दिसत आहे. तसेच तैमूरही कॅज्युअल डेनिम पॅट-शर्टमध्ये दिसतो. मात्र, या आई-मुलाच्या जोडीने विमानतळावर सर्वांचे लक्ष वेढले होते.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सैफ लवकरच “तानाजी: द अनसंग वॉरियर’मध्ये झळकणार आहे. यात तो उदयभान राठोडची भूमिका साकारत असून त्याच्यासोबत अजय देवगण काम करत आहे. दुसरीकडे करीना अक्षय कुमारसोबत “गुड लुक’मध्ये झळकणार आहे.