सैफकडून करिष्माला स्पेशल गिफ्ट

करिनाबरोबरच्या लग्नाच्यावेळी सैफ अली खानने करिष्माला एक उंची गाऊन प्रेझेंट दिला होता. “डान्स इंडिया डान्स’ च्या परीक्षणासाठी करिष्मा हाच गाऊन घालून आली होती. त्यावेळी तिने आपल्याला मिळालेल्या या स्पेशल प्रेझेंटबाबतची हकिगत सांगितली. “नवाब साहेबांनी आपल्या नवाबी स्टाईलमध्ये मला ही मौल्यवान भेट दिली आहे. या उंची गाऊनबरोबर इअररिंग्जची जोडीही सैफने दिली आहे.’ असे करिष्मा म्हणाली.

सैफ आणि करिनाने ऑक्‍टोबर 2012 मध्ये लग्न केले. आता त्यांचा तैमूरही तीन व्रर्षांचा होऊन गेला आहे. सध्या सैफ आणि करिना लंडनमध्ये व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडत आहे. सैफ सध्या “जवानी जानेमन’चे शुटिंगही करतो आहे. तर करिना कपूर इरफान खानबरोबर “अंग्रेजी मिडीयम’च्या शुटिंगमध्ये बिझी आहे. “डान्स इंडिया डान्स’च्या परीक्षकांमध्ये करिनाही आहे. पहिल्या काही एपिसोडच्या शुटिंगसाठी ती लंडनवरून ये-जा करत होती. तर करिष्माही आपल्या बहिणीकडे सुटीला गेली होती. दोघी बहिणींनी लंडनमध्ये केलेल्या एन्जॉयचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
वर्कफ्रंटच्या बाबतीत बोलायचे तर करिष्माला कमबॅकसाठी चांगला ऑप्शन मिळाला आहे.

 

View this post on Instagram

 

Let’s dance ! #behindthescenes @danceindiadance.official #dancekajungistaan #zeetv

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

“मेंटलहूड’ नावाच्या सिनेमामध्ये ती एका शास्त्रज्ञाच्या पत्नीच्या रोलमध्ये दिसणार आहे. तिच्या या नवऱ्याचा रोल संजय सूरी करणार आहे. सिनेमामध्ये कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे पात्र साकारणाऱ्या करिष्माला प्रत्यक्षात काही संसारातील महत्त्वाचे स्थान मिळू शकले नाही. आता तिच्या या सेकंड इनिंगमध्ये अधिक चांगले रोल तिला करायला मिळतील, अशी अपेक्षा.

Leave A Reply

Your email address will not be published.