कार्तिक आर्यनची फ्रेंच दाढी झाली गुल

कार्तिक आर्यन सध्या “लव्ह आज कल 2’च्या शुटिंगमध्ये बिझी आहे. त्या सिनेमातील काही फोटोदेखील व्हायरल झाले आहेत. काही फोटोंमध्ये तो सारा अली खानबरोबर स्कूटरवरून फिरतानाही दिसतो आहे. अलिकडेच त्याचा रेल्वे स्टेशनवरचा एक फोटो व्हायरल झाला होता, त्यामध्ये त्याची फ्रेंच दाढी स्पष्ट दिसत होती. मात्र इतक्‍यातच त्याचा आणखी एक फोटो नेटवर ऍव्हेलेबल झाला आहे, त्यात ही फ्रेंच दाढी एकदम गायब झाली आहे. त्याने एकदम क्‍लीन शेव्ह केल्याचे या फोटोमध्ये दिसते आहे.

एवढेच नव्हे तर तो स्कूल युनिफॉर्ममध्ये स्कूटर चालवताना दिसतो आहे. त्याची हेअरस्टाईलही अगदी शाळकरी मुलांसारखी बारीक आणि तेल लावल्यासारखी दिसते आहे. या त्याच्या अनोख्या लुकमुळे तो अगदी स्कूल बॉय वाटू लागला आहे. या फोटोवरून हा अंदाज सहज केला जाऊ शकतो, की हा फोटो “लव्ह आज कल 2’च्या सेटवरच काढला गेला असावा. त्याचा हा लुक बघून “रब ने बनायी जोडी’मधील शाहरुख खानच्या लुकची नक्की आठवण येईल. कार्तिकचा हा लुक सिनेमात नेमक्‍या कोणत्या सीनसाठी आहे, हे बघण्यासाठी “लव्ह आज कल 2′ बघावा लागेल. पण त्यासाठी आणखी काही महिने वाट बघावी लागेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.