दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध ‘कारगिल’

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते. हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. दरम्यान, भारतीय सैन्याला युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभवन आला.

अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध असल्यामुळे युद्ध कसे-कसे पुढे जात आहे, याकडे सर्व जगाचे लक्ष होते. परंतु भारताने युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. आणि भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली आणि काही महिन्यांतच पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)