बॉलीवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने 14 मार्च रोजी आपला 56वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. या खास दिनानिमित्त एकीकडे आमीरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर असंख्य फोटो, व्हिडिओ आणि कमेंटस् करत शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे अनेक सेलिब्रिटीजने देखील आमीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर-खानने देखील आमिर खानला खास पद्धतीने बर्थ-डे विश केले आहे. करिनाने आपल्या आगामी “लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटातील आमीर खानचा एक फोटो शेअर केला आहे. लांब चाढी, डोक्यावर पगडी, स्लेटी कुर्ता, खांद्यावर मेजरमेंट टेप आणि चेह-यावर एक सुंदर अशा हास्यातील आमीर खानचा लुक खूपच छान दिसत आहे.
या फोटोसह करीनान एक सुंदर अशा बर्थ-डे मॅसेजदेखील शेअर केला आहे. तिने लिहिले की, वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा मेरे लाल… तुझासारखा दुसरा कोणीही होणार नाही… या चित्रपटात तु जी जादू केली आह, ती चाहत्यांना दाखविण्यासाठी मी जास्त काळ वाट पाहू शकत नाही.’ दरम्यान, आमीर आणि करिनाची जोडी “लाल सिंह चढ्ढा’मध्ये तिस-यांदा झळकणार आहे. यापूर्वी ही जोडी “3 इडियड्स’ आणि “तलाश’मध्ये झळकली होती.