करिनाने यासाठी वापरला साईज झिरोचा फंडा !

मुंबई – ‘बेबो’, ‘बेगमजान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूर खान हिने नेहमीच विविध विषयांवर तिची ठाम भूमिका मांडली आहे. एखाद्या कलाकाराला पाठिंबा देणे असो किंवा मग पतीच्या पूर्वायुष्याविषयी वक्‍तव्य करणे असो. करीनाने नेहमीच या सर्व गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले आहे. अशातच करिनाने ह्युमन आॅफ बॉम्बे या फेसबुकवर पेजवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये तिच्या करिअरबाबत खुलासा केला आहे.

करिनाने फेसबुक पेज ह्युमन आॅफ बॉम्बे यावर पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या करिअरची सुरुवात फार चांगली होती. मी अनेक शानदार चित्रपट दिलेत. पण एक वेळ अशीही होती, जेव्हा मी एकही चित्रपट केला नाही. माझे करिअर आता संपले, असे मला वाटू लागले. मी नव्या दमाने सुरुवात करावी, साईज झिरोचा फंडा वापरावा, असा सल्ला याकाळात मला अनेकांनी दिला. कदाचित प्रत्येकाच्या करिअरमध्ये हे असे एक वळण येते. लोक सल्ला देतात. पण हे वळण तुम्हाला एकट्याने पार करायचे असते. हा काळ अतिशय वाईट असतो. सगळ्या नजरा तुमच्यावर असतात.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.