अभिनेता अजय देवगण आणि करिना कपूर यांनी अनेक चित्रपटांत एकत्रित काम केलेले आहे. यात ओमकारा, सत्याग्रह, गोलमाल सीरीज, सिंघम-2 यांसारखा हिट चित्रपटांचाही समावेश आहे. या दोघांची जोडी बॉक्स ऑफिसवर हिट ठरली असून त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
सध्या करिना कपूर आणि अजय देवगण या दोघांचा एक जुना किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा किस्सा दोघांमधील स्क्रीनवर किस करण्याच्या सीनबाबतचा आहे. या दोघांचा 7 वर्षांपूवीच्या एका चित्रपटातील हा किस्सा आहे. करिना आणि अजय यांनी प्रकाश झा यांच्या “सत्याग्रह’मध्ये एकत्रित काम केले होते.
या चित्रपटात दोघांचा एक लिप-लॉक सीन चित्रित करण्यात येणार होता; परंतु करिनाने अजयला किस करण्यास स्पष्ट नकार दिला होता. एका मॅगझीन रिपोर्टनुसार, करिनाचे सैफ अली खानसोबत 2012 मध्ये लग्न झाले होते. या लग्नाच्या काळातच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यामुळे लग्नाच्याप्रसंगी असे सिन करण्यास करिना तयार नव्हती. यामुळेच करिनाने अजयसोबत किस न करण्याचा निर्णय घेतला होता.
करिनाने लग्नाच्या अगोदर अनेक चित्रपटात लिपलॉक सीन केले होते. ज्यात “जब वी मेट’मधील सीनची खूपच चर्चा झाली होती. तसेच “कमबख्त इश्क’मध्ये करिनाने अक्षय कुमारसोबत 10 वेळा लिप-लॉक सिन केला होता. याशिवाय “की और का’मध्येही अर्जुन कपूरसोबत तिने किसिंग सीन केला होता.