मुंबई – ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नुकतीच अभिनेत्री करीन कपूर खानने हजेरी लावली. चित्रपट निर्माता करण जोहर स्वतः हा शो होस्ट करतो. या शोमध्ये आलेल्या प्रत्येकाला करण त्याच्या खाजगी आयुष्यासह अनेक काँट्रव्हर्सीला उत्तर द्यायला भाग पाडतो. करीना कपूर शोमध्ये आल्यानंतर देखील करणने तिला असेच काही प्रश्न विचारले. याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे ज्यात करीन आपल्या सेक्स लाईफबद्दल बोलते.
प्रोमोमध्ये करणने करीनाला मुलं झाल्यानंतर तिची सेक्स लाईफ कशी आहे, असा प्रश्न विचारला असल्याचे पाहायला मिळते. यावर करिनाने दिलेले उत्तर ऐकून करणशी बोलणे बंद होते असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळते. कॉफी विथ करणच्या पाचव्या पर्वात आमिर खान आणि करीना कपूर खान आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत त्याचाच हा प्रोमो आहे.
या एपिसोडच्या प्रोमोच्या सुरुवातीला करण करीनाला विचारतो की मुलांना जन्म दिल्यानंतर सेक्स लाईफ चांगली आहे का ? यावर करीना म्हणते की, “करण ते तुला कळणार नाही”. करीनाचे उत्तर ऐकताच करण थक्क झाला. त्याने करीनाला सांगितले की त्याची आई देखील हा शो पाहते आणि ती देखील अशा गोष्टी ऐकते. करीना नेहमीच तिच्या हजरजबाबी विनोदीपणासाठी ओळखली जाते हेच यावेळी तिने दाखवून दिले.
View this post on Instagram
आमिरनेही लगावला टोला
यावेळी आमिरनेही करणला टोला लगावला आहे. करणच्या प्रश्नाचे उत्तर करिनाने दिल्यावर करणने सांगितले की, त्याची आई देखील शो पाहते, तेव्हा आमिर म्हणाला, जेव्हा करण इतरांना त्यांच्या सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारतो तेव्हा त्याची आई हा शो पाहत नाही. यावरही करण पूर्णपणे गप्पच होता.