मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरच्या फॅशन सेन्सला उत्तर नाही. जेव्हा अभिनेत्री एखादा ड्रेस घालते तेव्हा तो एक फॅशन ट्रेंड बनतो. करीना तिच्या लूकने चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. पण एकदा करीनाने असा ड्रेस घातला होता, ज्यामुळे तिला खूप परेशानी झाली होती. अभिनेत्री उप्स मोमेंट शिकार झाली त्यावेळी ती केसांच्या साहाय्याने उप्स मोमेंट लपवताना दिसली. करीनावर ही वेळ सासू समोर असताना आली होती.
करीना कपूर अभिनेत्री सोहा अली खानच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये पोहोचली होती. या इव्हेंटमध्ये करिनासोबत पती सैफ अली खान, सोहा अली खान, शर्मिला टागोर, कुणाल खेमू यांनीही हजेरी लावली होती. यादरम्यान करीना रेड कलरच्या डीप नेक ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती. मात्र, या ड्रेसमुळे तिला कॅमेऱ्यासमोर खूप त्रास सहन करावा लागला.
कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री अस्वस्थ दिसत होती. तिला वारंवार ड्रेसचा कट केसांपासून लपवावा लागत होता. इतकंच नाही तर इव्हेंटच्या शेवटी, जेव्हा कुटुंबासोबत फोटो क्लिक करण्याची वेळ आली तेव्हा तिने तिच्या हातात असलेल्या एका व्यंगचित्राच्या साहाय्याने ड्रेसचा कट लपवावा लागला. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरस झाला होता.