‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटासाठी करीना साकारणार कॉपचा रोल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता दिनेश विजान यांच्या आगामी ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचे शूटिंग सध्या लंडनमध्ये सुरु आहे. या सिनेमात इरफानसह अभिनेत्री ‘करीना कपूर खान’ मुख्य भूमिका साकारणार आहे.

‘अंग्रेजी मीडियम’ मध्ये करीना पहिल्यांदाच कॉपचा रोल साकारत असून, सध्या सोशल मीडियावर तिचा हा लुक जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, ही भूमिका साकारण्यासाठी करीना कपूर दिग्दर्शक होमी अदजानिया यांचे मार्गदर्शन घेत आहे. ‘हिंदी मिडियम’ या गाजलेल्या चित्रपटाचा ‘अंग्रेजी मिडियम’ हा सिक्‍वेल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.