नवी दिल्ली – करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या जबरदस्त फॅशन सेन्समुळे ती चर्चेत असते. करीनाला हेल्दी लाईफस्टाइल जगायला फार आवडते हे तिच्या सततच्या पोस्टवरून दिसून येते. काही दिवसांपूर्वी करीनाला करोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून ती आता हळूहळू बरी होत आहे.
दरम्यान, इंस्टाग्रामवर करीनाने एक पोस्ट शेअर केली आहे. इंस्टापोस्टमध्ये ती तिचा आवडता वर्कआउट योगा असल्याचे सांगत आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर योगा मॅटवर बसलेला फोटो अपलोड केला आहे. ब्लॅक कलरच्या जिम वेअरमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. या फोटोत करीना हसत हसत कॅमेऱ्याकडे पाहत असल्याचे दिसते. हा फोटो शेअर करण्यासोबतच करिनाने कॅप्शनद्वारे तिचे एक रहस्यही उघड केले आहे.
View this post on Instagram
मॅटवर बसल्याचा फोटो शेअर करत करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझी आवडती मुलगी योगा ट्रेनर अनुष्कासोबत आवडत्या जागेवर माझ्या मॅटवर परतले’. करीना म्हणाली की, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, आम्ही ते करू शकू. यानंतर करीनाने तिच्या मागे असलेल्या छोट्या पांढऱ्या रंगाच्या टॉय कारचे वर्णन तिची कार असे केले. करिनाचा फिटनेस आणि जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी इंस्टाग्रामवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने तिला पॉवर गर्ल म्हटले आणि दुसर्याने खूप फिट दिसत असल्याचे लिहिले आहे. चाहत्यांनी पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स पाऊस पाडला आहे.