मुंबई – बॉलिवूडची सर्वात ग्लॅमर्स अभिनेत्री “करीना कपूर’ नेहमीच तिच्या स्टनिंग लुकसाठी चर्चेत असते. “चमेली, अशोका आणि जब वुई मेट’ सारख्या रोलमुळे तिला नायिकांमधील लुक आणि हटके अंदाजामुळे ती ओळखली जाते.
तसेच करीनाला नेहमीच सोशल मीडियामध्ये ग्लॅमर्स लुक आणि अभिनयला युजर्स दाद देत असतात. उत्तम फॅशनसेन्ससाठी करीनाची कायमच सर्वत्र चर्चा होत असते. त्यामुळे अनेक तरुणी तिची स्टाईल फॉलो करण्याचा प्रयत्न करतात.
दरम्यान, अश्याच ग्लॅमर्स आणि स्टनिंग अभिनेत्रीचा म्हणजेच, “करीना कपूर खान’चा आज 40 वा वाढदिवस आहे. तीचा हा दिवस खास बनवण्यासाठी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या तिच्या या बर्ड-डे पार्टीचे फोटो इंस्टाग्रामवर चांगलेच व्हायरल होत आहे.
या फोटोंमध्ये करीनासोबत आई बबीता कपूर, वडील रणधीर कपूर, बहीण करिश्मा कपूर आणि पती सैफ अली खान यांच्यासह इतर सदस्य करीनाच्या बर्थडे पार्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. करीना पुन्हा एकदा आई बनणार आहे. लवकरच करीना आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे.
दरम्यान, आपल्या वाढदिवसानिमित्त करिनाने सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे. करीना म्हणाली कि, “मी वयाच्या चाळीशीत पदार्पण करत आहे. मला खूप प्रेम करायचं आहे, हसायचं आहे, माफ करायचं आहे, विसरायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रार्थना करायची आहे. मला ताकद देणाऱ्यांचे आभार मानायचे आहे. हे बिग 40! आणखी बिग करू” असं तिने म्हंटलं आहे.