“अंग्रेजी मीडियम’मध्ये झळकणार करीना कपूर

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर यापूर्वी “वीरे दी वेडिंग’ चित्रपटात झळकली होती. आता ती इरफान खानसोबत “अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात करीना कपूर कोणती भूमिका साकारणार हे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेची बाब आहे. दरम्यान, करीनाने अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांच्यासोबतच्या “गुड न्यूज’ चित्रपटाचे शुटिंग नुकतेच पूर्ण केले आहे.

चित्रपट निर्माता दिनेश विजन यांनी कन्फर्म केले आहे की, त्यांच्या आगामी “अंग्रेजी मीडियम’मध्ये करीना कपूर-खान काम करणार आहे. हा चित्रपट दिनेशसाठी खूपच स्पेशल असून चित्रपटात करीना काम करत असल्याने त्यांनी आनंद व्यक्‍त केला आहे. हा चित्रपटाची स्क्रिप्ट करीनाला खूप आवडली असून तिने तातडीने ग्रिन सिग्नल दिला. पण करीनाच्या रोलबाबत सस्पेंस ठेवण्यात आला आहे.

या चित्रपटात ती इरफानची लव-पार्टनरची भूमिका साकारत नाही. तिची भूमिका सीरियस असणार आहे, पण चित्रपटातील तिचे सीन्स फनी आहेत. यामुळे करीनाचा गंभीरता आणि कॉमिडी यांचा मिक्‍सचर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. दिनेश विजन म्हणाले की, करीनाची भूमिकाच या फ्रैंचाइजला पुढे घेवून जाणार आहे. याचा अर्थ असा की, चाहत्यांना या चित्रपटाचा सिक्‍वलही पाहता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.